Kolhapur : शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग; ठाकरे गटाच्या शहर प्रमुखासह 40 जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics Kolhapur Ganesh Visarjan 2022

महाराष्ट्रातील राजकारणात मोठा गदारोळ पहायला मिळत आहे.

Kolhapur : शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग; ठाकरे गटाच्या शहर प्रमुखासह 40 जणांवर गुन्हा

कोल्हापूर : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) मोठा गदारोळ पहायला मिळत आहे. शिंदे गट-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. कोल्हापूरतही (Kolhapur) शिंदे विरुध्द ठाकरे असाच काहीसा सामना रंगताना दिसत आहे. कोल्हापुरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय. इथं शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग करण्यात आलाय.

या विनयभंगप्रकरणी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शहर प्रमुखासह 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत (Ganesh Visarjan 2022) शिंदे गटाच्या स्टेजसमोर या सर्वांनी लज्जा उत्पन्न होईल, असं वक्तव्य करत डान्स केल्याचा आरोप केला गेला आहे.

हेही वाचा: Ratnagiri : शिवसेना नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल, मित्रांच्या मदतीनं पत्नीला..; आरोपी पतीला अटक

याप्रकरणी शहरप्रमुख रवीकिरण इंगवले (Ravikiran Ingawale) यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेतील फिर्यादी कोल्हापूर शहर शिवसेना या राजकीय पक्षाच्या संघटक आहेत. फिरंगाई तरुण मंडळ शिवाजीपेठ, कोल्हापूर (Firangai Tarun Mandal Shivajipeth, Kolhapur) यांची मिरवणूक आलेली असताना हा प्रकार घडला. सध्या शिवसेना पक्षात पडलेले दोन गट आणि त्यांच्यातील वाद रागात धरून हे कृत्य करण्यात आल्याचं फिर्यादीनं म्हटलंय.

हेही वाचा: Delhi Liquor Policy : आरोग्यमंत्र्यांच्या चौकशीपूर्वीच ED ची 40 ठिकाणी धाड

Web Title: Case Filed Against 40 People Including Thackeray Group City Chief Ravikiran Ingawale Kolhapur Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..