Ratnagiri : शिवसेना नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल, मित्रांच्या मदतीनं पत्नीला..; आरोपी पतीला अटक

महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळ सुरु असतानाच रत्नागिरीत एक धक्कादायक घटना घडलीय.
Ratnagiri Crime News
Ratnagiri Crime Newsesakal
Updated on
Summary

महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळ सुरु असतानाच रत्नागिरीत एक धक्कादायक घटना घडलीय.

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात गदारोळ सुरु असतानाच रत्नागिरीत (Ratnagiri) एक धक्कादायक घटना घडलीय. या घटनेमुळं संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. शिवसेना नेत्यानं मित्रांच्या मदतीनं पत्नीला पेट्रोल टाकून जाळलं, यात तिचा मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी शिवसेना नेता सुकांत सावंत (Shiv Sena leader Sukant Sawant) हा स्वत: पोलीस स्टेशनला गेला आणि त्यानं पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी सुकांतला चौकशीसाठी बोलावलं. पोलिसांच्या (Ratnagiri Police Station) सखोल चौकशीनंतर त्यानं आपणच हत्या केल्याचं कबूल केलं. रोजच्या भांडणामुळं वैतागून आपण हत्या केल्याचं त्यानं मान्य केलं. पोलिसांनी या हत्येप्रकरणी सुकांत सावंत यांच्यासह तिघांना अटक केलीय. पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली आहे, त्यात शिवसेना नेते सुकांत सांवत, रुपेश सावंत आणि प्रमोद गवानंग यांचा समावेश आहे.

Ratnagiri Crime News
नितीशकुमारांनी 'ही' अट मान्य केल्यास, त्यांना पाठिंबा देणार; प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

पत्नीला जाळल्यानंतर तिचं पार्थिव समुद्रात फेकून दिलं

सुकांत सावंतनं पत्नीला जाळल्यानंतर तिचं पार्थिव समुद्रात फेकून दिलं, यावेळी त्याचे सहकारीही तिकडे उपस्थित होते. पुरावा मिळू नये म्हणून आरोपींनी महिलेची हाडं समुद्रात वेगवेगळ्या ठिकाणी टाकली, असं पोलिसांनी सांगितलं. सुकांतची पत्नी स्वप्नाली सावंत (Swapnali Sawant) रत्नागिरी पंचायत समितीच्या अध्यक्ष होत्या. सुकांत सावंतही स्थानिक नेता आहे. सध्या पोलिसांनी सुकांत सावंत यांच्यासह तिघांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com