esakal | चंदगड: मूर्ती विसर्जनाची वेळ वेगवेगळी ठेवा
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड: मूर्ती विसर्जनाची वेळ वेगवेगळी ठेवा

चंदगड: मूर्ती विसर्जनाची वेळ वेगवेगळी ठेवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंदगड: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणेशमूर्ती विसर्जनावेळी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे यासाठी आज येथे नगरपंचायतीच्या वतीने नियोजन बैठक घेण्यात आली. बैठकीत मंडळांना व नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या. नगराध्यक्षा प्राची काणेकर अध्यक्षस्थानी होत्या.

हेही वाचा: सोयाबीनवर तांबेऱ्याचा प्रादूर्भाव; शेतकऱ्यांमागे संकटांची मालिका

संतोष कडूकर यांनी शासनाकडून आलेल्या परिपत्रकातचे वाचन केले. नगराध्यक्षा काणेकर म्हणाल्या, ‘गर्दी टाळण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. विशेषत: विसर्जनावेळी एकाच वेळी सर्व मंडळांचे गणपती बाहेर पडले तर गर्दी होते. ती टाळण्यासाठी प्रत्येक मंडळाने वेळ निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.’

पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर म्हणाले, ‘कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सवाचा आनंद लुटा. आवश्यक त्या परवानगी घ्या.’ कर निर्धारण अधिकारी आशुतोष कांबळे म्हणाले, ‘घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती व निर्माल्य विसर्जनापासून जल प्रदूषण होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मूर्ती व निर्माल्य नगरपंचायतीकडे दान करून सहकार्य करावे.’

उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, दिलीप चंदगडकर, अभिजित गुरबे, आनंद हळदणकर, अनुसया दाणी, अनिता परीट, नेत्रदीपा कांबळे, सचिन नेसरीकर, दिगंबर कोट, विनायक हावलदार, प्रथमेश गडकरी, सौरभ पाटील, सागर हवालदार उपस्थित होते.

loading image
go to top