

Kolhapur Rumors
esakal
Infant Cry Confusion : पतीसोबत निघालेल्या एका महिलेला शेंडापार्क कुष्ठधामपासून काही अंतरावर बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याचा भास झाला. तिने याची माहिती आपल्या भावाला दिली.
शेंडा पार्कातून जाणाऱ्या एका महिलेने बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याचे काही वाहनधारकांना सांगितले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरत गेल्याने आसपासच्या भागातील तरुण, नागरिक मोठ्या संख्येने शेंडा पार्क परिसरात गोळा झाले. गर्दी वाढल्याने पोलिसही तातडीने आले. सुमारे तीन तासांहून अधिक वेळ शोध घेऊनही अर्भक न सापडल्याने ही अफवा असल्याचे समोर आले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत येथील गर्दी हटण्याचे नाव घेत नव्हती.