

राजू शेट्टी समर्थक आणि पोलिसांमध्ये कोल्हापुरात तीव्र झटापट झाली.
esakal
Kolhapur Political News : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात पोलिसांनी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर यांना धक्काबुक्की केल्यामुळे आंदोलक संतप्त झाले. गड्ड्यान्नावर यांना जबरदस्तीने ताब्यात घेताना आंदोलकांनी विरोध केला. त्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत गड्ड्यान्नावर यांना ताब्यात घेऊन चंदगडला नेले. मात्र, जोपर्यंत त्यांना आंदोलनस्थळी आणले जात नाही, तोपर्यंत इथून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.