ब्रेकिंग: कोल्हापूर लॉकडाऊन विषयी जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन आदेश

ब्रेकिंग: कोल्हापूर लॉकडाऊन विषयी जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन आदेश
Summary

कडक लॉकडाऊन रविवारी रात्रीर्यंतच, सोमवारपासून सात ते अकराच व्यवहार - पूर्वी प्रमाणे लॉकडाऊन १ जूनपर्यंत कायम ; जिल्हाधिकारी

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन (Kolhapur Lockdown)रविवारी (ता.२३) मध्यरात्रीपासून शिथील करण्यात आले आहे. सोमवार (ता.२४) पासून केवळ सकाळी सात ते अकरा दरम्यान भाजीपाला दुध, किराणा (Food, Milk)खुला होणार असून त्यानंतर पुन्हा संचार बंदी असणार आहे. एक जून सकाळी सात पर्यंत अशा पद्धतीचे लॉकडाऊन असणार आहे. तसेच घरपोच सेवा सकाळी सात ते रात्री आठ दरम्यान सुरू राहणार आहे.

हॉटेलची पार्सल सेवा, एमआयडीसीतील उद्योग, बॅंका सुरू राहणार आहेत. मात्र अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वगळता इतर दुकाने, व्यापार बंद राहणार आहे. लग्नासाठी केवळ दोन तास आणि पंचवीस व्यक्‍तींना परवानगी असणार आहे. एकंदारीतच कडक लॉकडाऊन पूर्वी असलेले नियम कायम असणार आहेत. याबाबतचे नवीन आदेश आज जिल्हाधिकारी दौलत देसाई (collector daulat desai)यांना जाहीर केले. (collector daulat desai order lockdown update kolhapur news)

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी 15 ते 23 मे दरम्यान केलेला कडक लॉकडाऊन पुढे वाढविला जाणार नसल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी रात्री बारापासून पुढे राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार पुढील लॉकडाऊन असणार आहे. जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात रोज किमान एक हजाराहून अधिक नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आजही आढळत आहेत. तसेच मृत्यूची संख्या ही तीस ते साठ पर्यंत रोज झाली होती. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांनी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी चर्चा करून कडक लॉक डाऊनचे निर्बंध घातले होते. हे निर्बंध उद्या (रविवारी) रात्री बारापर्यंत लावले होते. ते पुढे वाढणार की नाही याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर कडक लॉकडाऊन रविवारी रात्री बारा पर्यंतच राहील. असे जाहीर करण्यात आले आहे.

२४ ते ३१ मे दरम्यान राज्य शासनाच्या नियमानुसार लग्नासाठी केवळ २५ व्यक्तींना दोन तासांसाठी परवानगी दिली आहे. त्यामध्येही सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था ही आवश्‍यक आहे. याची नोंदही संबंधित अस्थापणाकडे होणे आवश्‍यक आहे.

हे सुरू राहणार -

०) रुग्णालय, रोगनिदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषध निर्मीती उद्योग, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व त्यांना आवश्‍यक अशा अनुषंगिक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी.

०)लस निर्जंतूके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहय्याभूत कच्चामाल उद्योग, आणि अनुशंगिक सेवा यांचे उत्पादन आणि वितरण

०)शासकीय आणि खासगी पशू वैद्यकीय सेवा आणि दवाखाने, ॲनिमल केअर सेंटर, पेटफूड शॉप,

०) किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारचे खाद्य दुकाने (चिकन,मटन,मासे,अंडी आणि पोल्टी दुकाने)

०) हॉटेल पार्सल सेवा सुरू राहणार

०) कृषी विषयक सेवा

०) शेती संबंधित उत्पादने, औजारे निर्मीती

०) पाळीव जनावरांची खाद्य दुकाने

०) शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सून पूर्व कामकाजांसाठीची आवश्‍यक दुकाने

०) जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या, सकाळी सात ते अकरापर्यंत सुरू असतील.

०) घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना बाजारसमितीत जावून माल घेता येईल.

०) शीतगृहे व साठवणुकीची गोदाम सेवा

०)सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (विमान,टॅक्सी, रिक्षा,सार्वजनिक बसेस)

०) परराष्ट’ संबंधित कार्यालयीन सेवा

०) स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणारी सर्व मान्सून पूर्व कामे व उपक्रम, सर्व सार्वजनिक सेवा

०) आरबीआय कडून अत्यावश्‍यक म्हणून घोषित केलेल्या सेवा

०)सीबी मान्यता प्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था

०) दूरसंचार सेवा सुरू राहण्यासाठी आवश्‍यक दूरुस्ती व देखभाल बाबी

०)मालांची व वस्तूंची वाहतूक

०) पाणी पुरवठा सेवा

०)व्यापारी मालाची आयात निर्यात

०) ई-कॉमर्स (फक्त अत्यावश्‍यक सेवा)

०) माल पुरवठा निगडीत

०) मान्यता प्राप्त प्रसारमाध्यमे

०)पट्आ’ल पंप आणि संबंधित उत्पादने

०) सर्व कार्रोसेवा

०) डेटा सेंटर

०) आयटी तंत्रज्ञान पायाभूत सुविधा

०) शासकीय व खासगी सुरक्षा विषयक सेवा

०) विद्युत आणि गॅस पुरवठा सेवा

०)एटीएम

०) पोस्टल सेवा

०) बंदरे आणि त्या अनुषंगीक सेवा

०)कस्टम हाऊस एजन्स, परवानाधारक मल्टीमोडल ट्रान्स्पोट ऑपरेटर

०)अत्यावश्‍यक सेवेसाठी लागणार कच्चा माल

०) पॅकेजींग मटेरीयल उत्पादन करणारे उद्योग

०) वणीकरणा संबंधित कामकाज

०) विमान चलन आणि संबंधित सेवा

०)जीवनावश्‍यक वस्तू व अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग, व्यापारी अस्थापना, कार्यालये, इतर आस्थापना, सेवा पुरविणारे घटक, बंद असतील.

०) योग्य कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी

०) घरेलू कामगार, वाहन चालक, सह्यायक (काळजी वाहक), यांना अपवादात्मक प्रकारामध्ये काम करण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार प्राधिकरणकडून निर्यण घेण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com