Sugarcane Farmers Protest : ऊसदर आंदोलनाचा दुकानदारांकडून गैरफायदा महामार्गावर लूट, ट्राफिकमध्ये अडकलेल्यांना २० रुपयांची पाण्याची बाटली ५० रुपयांना!

Highway Traffic Jam Kolhapur : ऊसदर आंदोलनामुळे पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांकडून काही दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जात असून, २० रुपयांची पाण्याची बाटली ५० रुपयांना विकली जात आहे.
Sugarcane Farmers Protest Highway Traffic Jam Kolhapur

Sugarcane Farmers Protest Highway Traffic Jam Kolhapur

esakal

Updated on: 

Pune Bangalore Highway Traffic : ऊसदराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनाचा मोठा फटका पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बसत आहे. महामार्गावर शेकडो ट्रक, टँकर आणि ट्रेलर्स गेल्या तीन दिवसांपासून अडकून पडले आहेत. त्यामुळे ट्रकचालकांची मोठी गैरसोय होत असून, खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दरही वाढल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. वीस रुपयांची पाण्याची बाटली पन्नास रुपयांना, दहा रुपयांचा चहा पंचवीस रुपयांना, तर पन्नास रुपयांना वडापाव विकला जात असल्याचे चालकांनी सांगितले. अडकलेल्या चालकांच्या अगतिकतेचा काही विक्रेत्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

Kognoli Toll Plaza Traffic Update Heavy Vehicles Stopped After Farmers Protest At Kinni Causes Long Queues On Highway
Pune Bangalore Highway Traffic Diversion
Pune Bangalore Highway Traffic
Raju Shetti Protest News