esakal | जनता कर्फ्यूमध्ये ७४ जणांची केली कोरोना तपासणी..
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus impact kolhapur district kolhapur marathi news

सीपीआरमध्ये ७४ जणांची कोरोना तपासणी.. 
उपचारांसाठी चौघे दाखल; दोघांचे स्वॅप प्रयोगशाळेस पाठविले

जनता कर्फ्यूमध्ये ७४ जणांची केली कोरोना तपासणी..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सीपीआरच्या कोरोना कक्षात आज ७४ जणांनी तपासणी केली. यात दोन संशयितांचे स्वॅप घेतले; तर चौघांना उपचारांसाठी दाखल केले. अद्याप कोणालाही कोरोना झाल्याचे तपासणीत आढळलेले नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली.

कोरोनापासून खबरदारीचा भाग म्हणून आज ‘जनता कर्फ्यू’ पुकारला. त्याला  शंभर टक्के प्रतिसाद मिळाला अशात सीपीआरच्या तपासणी व उपचार कक्षात परदेशातून आलेल्या १४ स्थानिक व्यक्ती तर देशाच्या विविध भागातून आलेल्या ७२ जणांची तपासणी झाली. यात दोघांना सर्दी, ताप, खोकला, घसा दुखीची लक्षणे असल्याने त्यांचे स्वॅप तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.  

उर्वरितांना तपासणी करून घरी सोडले आहे. अशांच्या प्रकृतीवर आरोग्य विभाग लक्ष ठेवणार आहे. तसेच त्यांनी सलग १५ दिवस घरातून बाहेर पडू नये अशा सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा- होम क्वारंटाईनचा शिक्का मारताना डॉक्‍टरच गेले पळून....

स्वॅप रुग्णवाहिकेतून 
सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहिल्याने पुण्याला पाठविण्यात येणारे स्वॅप आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले.
दाखल देणे स्थगितसीपीआरमधून दिव्यांगांसाठी दाखले देण्यात येतात मात्र कोरोनाचे गांभीर्य विचारात घेऊन दिव्यांगांना दाखले देण्याचे काम एक महिन्यासाठी तात्पुरते स्थगित केले आहे. 

 हेही वाचा-बंद म्हणजे बंद : काय राहणार सुरु आणि काय बंद वाचा... ​
अपघात संख्या शून्य
सीपीआरच्या अपघात विभागात रोज दहा ते पंधरा लहान मोठ्या अपघातातील जखमींना दाखल केले जाते. आज जनता कर्फ्यूमुळे कोणीही जखमी दाखल झाला नाही. त्यामुळे नियमित आजारातील रुग्णच फक्त रूग्णवाहिकेव्दारे विभागात आणले गेले. त्यामुळे अपघात विभागाचा ताण काहीसा हलका झाला.

 हेही वाचा-‘त्या’ नेपाळी बाबूंना अखेर काढले शोधून.... ​
महिलेची चौकशी
अबुधाबीहून आलेल्या आणि कोल्हापुरात वाहनातून प्रवेश करणाऱ्या महिलेला पोलिसांनी शुगरमिलजवळ थांबविले. या महिलेचे तपासणी केल्यानतंर तिच्या हातावर कॉरनटाईन असा शिक्का दिसून आला. महिलेला पोलिसांनी सागलीच सीपीआरमध्ये दाखल केले. महिलेने चौदा दिवस बंदिस्त राहणे गरजेचे आहे. त्यामुळे तिला प्रथम पोलिसांनी उपचारासाठी दाखल होण्याची विनंती केली. महिलेनेही ही विनंती मान्य केल्यानंतर पोलिसांनी तिला उपचारासाठी 
दाखल केले.

सीपीआरमध्ये मॉक ड्रील 
सीपीआरमधील कोरोना कक्षात आज मॉक ड्रील घेण्यात आले. कोरोना उपचार कक्षात अचानकपणे जास्त संख्येने व्यक्ती तपासणी व उपचारांसाठी दाखल झाल्यास वैद्यकीय सेवा तत्काळ कशी देता येईल, याची चाचणी घेण्यात आली. विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्‍टर व वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी कक्षात जाऊन पाहणी