कोल्हापूर - बीड खून प्रकरण; हत्यार हेब्बाळात अन् धडाचं शीर निलजीत

हा मृतदेह नांगनूर बंधाऱ्यातून गडहिंग्लजच्या पास रेस्क्यू टीमने बाहेर काढला.
murder
murdersakal media

गडहिंग्लज : लव्हुरी (ता. केज, जि. बीड) येथून अपहरण करून आणलेल्या सुधाकर हनुमंत चाळक (वय ५५) याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृताचे शीर निलजी बंधाऱ्यात टाकल्याचे संशयितांनी सांगितल्यानंतर शोध घेतला; मात्र शीर सापडले नाही. (Police Action) दरम्यान, हेब्बाळच्या नाल्यात सत्तूर सापडल्याचे केजचे पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले. (Beed Didtrict) खुनाच्या तपासासाठी केज पोलिसांचे पथक सलग दुसऱ्या दिवशीही गडहिंग्लज तालुक्यातच ठाण मांडले होते. (Crime News)

खूनप्रकरणी केज पोलिसांनी दत्तात्रय हिंदूराव देसाई (५८, कडगाव, ता. भुदरगड), तुकाराम मुंढे (५३, चारदरी, ता. धारूर, जि. बीड) व रमेश मुंढे (४५, पोटबन, ता. वडवणी, जि. बीड) यांना अटक केली आहे. (Kolhapur Crime News) चाळक लव्हुरीतून महिन्यापूर्वी बेपत्ता झाला होता. दरम्यान, ऊस तोड मजुरासाठी झालेल्या आर्थिक व्यवहारातून चाळक यांचा घातपात झाल्याचा संशय आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरविली. मुंढे व देसाई याची नावे पुढे आल्याने त्यांना ताब्यात घेतले. संकेश्‍वरजवळील नांगनूर बंधाऱ्यात चाळकचा मृतदेह टाकल्याची संशयितांनी कबुली देऊन जागाही दाखविल्यानंतर राबवलेल्या शोधमोहिमेत हा मृतदेह काल बंधाऱ्यात मिळाला.

murder
दरेकरांनंतर आता बावनकुळेंवर निशाणा, महाविकास आघाडीचा 'काऊंटर प्लॅन?'

शीर निलजी बंधाऱ्यात टाकल्याचे संशयितांनी सांगितल्यानंतर दुपारनंतर केज पोलिस पथकाने शोध मोहिम राबविली. कोल्हापूरहून पाण्यातील कॅमेरे व स्कूबा डायव्हींगच्या लोकांना पाचारण केले; परंतु सायंकाळी सातपर्यंत शीर सापडले नव्हते. हिरण्यकेशी नदीपात्रात पाणीही भरपूर असल्याने शोधमोहिमेत अडथळे येत असल्याचे सांगण्यात आले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात खुनासाठी वापरलेल्या हत्याराची चौकशी केली असता संशयीतांनी हेब्बाळ गावाजवळचा नाला दाखविला. त्याठिकाणी शोध घेतला असता हत्यार मिळाल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

दगड अन् तारेचा वापर

चाळकचा मृतदेह पाण्यात टाकल्यानंतर तो वर येऊ नये यासाठी संशयीतांनी मृत चाळकचे पाय दुमडून दोन्ही पायाच्या मध्ये २५ किलोचा दगड ठेवून शरीराला तारेने गुंडाळले होते. संपूर्ण धडाला ४० ते ४५ किलो वजनाचा दगड बांधला होता. हा मृतदेह नांगनूर बंधाऱ्यातून गडहिंग्लजच्या पास रेस्क्यू टीमने बाहेर काढला. आज सकाळी उपजिल्हा रुग्णालयात या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले.

murder
पंतप्रधान मोदी 'द काश्मीर फाईल्स'चे प्रचारक, राऊतांचा घणाघात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com