कोविड सेंटरमधून दोन कोरोनाबाधित बंदी पसार; कोल्हापूरातील घटना

आयटीआय आपत्कालीन कारागृहातील प्रकार
कोविड सेंटरमधून दोन कोरोनाबाधित बंदी पसार; कोल्हापूरातील घटना

कोल्हापूर : आयटीआय आपत्कालीन कारागृहातून रात्री उशिरा दोन कोरोना बाधित न्यायालीन बंदींनी खिडकीचे गज वाकवून पलायन केले. तशी पोलिसह कारागृब प्रशासनाची तारांबळ उडाली. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.

कळंबा मध्यवर्ती कारागृहात कोरोना बाधित कैदी आयटीआय आपत्कालीन कारागृहात उपचारासाठी दाखल करण्यात येते. या कारागृहात नव्याने दाखल होणारे बंदीही १४ दिवस ठेवण्यात येतात. तेथून त्यांची चाचणी करूनच त्यांना बिंदू चौक सब जेल आणि कळंबा मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात येते.

कोविड सेंटरमधून दोन कोरोनाबाधित बंदी पसार; कोल्हापूरातील घटना
मंत्र्यांच्‍या आदेशानंतरही कोल्हापुरात 'डेथ ऑडिट' कडे दुर्लक्ष

कळंबा कारागृहात जबरी चोरी आणि खुनाच्या गुन्ह्यातील दोन न्यायालयीन बंदींना ठेवण्यात आले होते. चाचणीत या दोघा बंदींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारासाठी त्या दोघांना आयटीआय आपत्कालीन कारागृहात हलवण्यात आले होते. येथील पहिल्या मजल्यावर या दोघा बंदींना ठेवण्यात आले होते. रात्री उशिरा साडेबाराच्या सुमारास दोघा बंदींनी खिडकीचे गज वाकवून ते दोघे पसार झाले. हा प्रकार येथील एका बंदीच्या लक्षात आला. त्याने आरडाओरडा केला. बंदोबस्तला असणाऱ्या पोलिसांनी तेथे धाव घेतली. पण त्यापूर्वी ते दोघे बंदी पसार झाले होते. याप्रकरणी कळंबा कारागृह प्रशासनाने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस त्या दोघा बाधित बंदींचा शोध घेत आहेत.

"या कारागृहात आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यास संदर्भातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. या कारागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलिस प्रशासनाकडे आहे."

- चंद्रमणी इंदुरकर (कळंबा कारागृह अधीक्षक)

कोविड सेंटरमधून दोन कोरोनाबाधित बंदी पसार; कोल्हापूरातील घटना
जाणून घ्या, अक्षय्य तृतीयेमागील शास्त्र आणि परंपरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com