

Kolhapur Attack
esakal
Kolhapur Crime News : पार्टीच्या वादातून मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर पाठलाग करून रोहन संजय हेरवाडे (वय २७, रा. सायबर चौक) याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. तसेच त्याच्या मोटारीची तोडफोड केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजारामपुरी पोलिसांनी संशयित ओम नितीन माने (२१, रा. कळंबा), विनायक रावसाहेब पाटील (३१) व राहुल उत्तम लोकरे (२६, दोघे रा. लक्षतीर्थ वसाहत) या तिघांना आज अटक केली. संशयितांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.