Kolhapur : डॉक्टर दाम्पत्याचं घर फोडून तब्बल 14 लाखांचा ऐवज लंपास; हिऱ्यांसह सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविले

राजारामपुरी पोलिस ठाण्यात (Rajarampuri Police Station) याची नोंद झाली आहे.
Doctor Couple Rajarampuri Police
Doctor Couple Rajarampuri Policeesakal
Summary

राजारामपुरी हद्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या एकाही चोरीचा तपास लागला नाही. तेथील अनेक चोऱ्यांचे तपास प्रलंबित आहेत.

कोल्हापूर : टेंबलाईवाडी परिसरातील कलानंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील डॉक्टर दाम्पत्याच्या बंद (Doctor Couple) घरातील कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने तब्बल १४ लाखांचा ऐवज चोरून नेला. दोन्ही बेडरूममधील कपाटातून हिऱ्याचे (Diamonds), सोन्याचे आणि चांदीचे दागिने, दहा हजार रुपयांची रोकड आणि लॅपटॉपचा त्यात समावेश आहे.

राजारामपुरी पोलिस ठाण्यात (Rajarampuri Police Station) याची नोंद झाली आहे. तब्बल आठवड्यापूर्वी घडलेल्या या प्रकाराची माहिती पोलिसांकडून आज देण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : डॉ. सरिता चौगुले यांनी फिर्याद दिली आहे. त्या पती डॉ. गजानन व दोन मुलींसह कलानंद सोसायटीत राहतात.

Doctor Couple Rajarampuri Police
Child Abuse Cases : बाल लैंगिक शोषणाच्या वर्षभरात तब्बल 84 घटना; तपासात धक्कादायक माहिती समोर, 89 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर सासरे, नणंद आणि भाचा राहतात. उचगाव येथे त्यांचा दवाखाना आहे. डॉ. चौगुले शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यात नोकरीस आहेत. सध्या ते कामानिमित्त बाहेरगावी आहेत. डॉ. सरिता १३ नोव्हेंबरला सायंकाळी त्यांच्या दोन मुलींसह माहेरी मिरज येथे गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती सासऱ्यांनी संपर्क साधून दिली.

Doctor Couple Rajarampuri Police
आता आरपारची लढाई! मुश्रीफ-सतेज पाटलांना गुडघे टेकायला लावणार; ऊसदरावरुन शेट्टींचा आक्रमक पवित्रा

त्यामुळे त्यांनी घरी येऊन पाहिले तेव्हा त्यांच्या दोन्ही बेडरूममधील कपाटातील दागिन्यांसह एकूण १४ लाखांचा ऐवज चोरीस गेला होता. याबाबतची माहिती आज राजारामपुरी पोलिस ठाण्यातून देण्यात आली. पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पथकाने पंचनामा केला. घटनास्थळी श्र्वानपथक, ठसे तज्ज्ञ बोलाविण्यात आले. याचा तपास पोलिसांनी तातडीने सुरू केला; मात्र आठवड्यानंतरही तपासात काहीच प्रगती झालेली नाही.

Doctor Couple Rajarampuri Police
Hasan Mushrif : ऊसदर आंदोलन चिघळलं! मुश्रीफांनी स्वाभिमानीला केलं 'हे' आवाहन; म्हणाले, राजू शेट्टींनी बिनबुडाचे..

पोलिसांपुढे तपासाचे आव्हान

राजारामपुरी हद्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या एकाही चोरीचा तपास लागला नाही. तेथील अनेक चोऱ्यांचे तपास प्रलंबित आहेत. त्याचे धागेदोरेही पोलिसांच्या हाती नाहीत. त्यामुळे या चोरीचा तपास हे देखील पोलिसांपुढे आव्हानच असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com