

kolhapur Digital Arrest Scam
sakal
गांधीनगर : ‘तुमच्या मोबाईलवरून आक्षेपार्ह मजकूर पाठविण्यात आला आहे. तुमच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे अटक वॉरंट आहे. हे वॉरंट रद्द करण्याचे आमिष दाखवून गोपाळ गजानन साळोखे (वय ६३, रा. कोयना वसाहत, गांधीनगर) यांची ६२ लाख ९५ हजार ६०६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.