Kolhapur Politics : 'या' कारणावरून मंडलिक-मुश्रीफ गटात वाद; केसरकर म्हणाले, 'एका घरात अशी धुसफूस..'

मुश्रीफ यांनी खासदार मंडलिक यांनी मंजूर केलेले कागल तालुक्यातील रस्त्याचे काम अडवले आहे.
Hasan Mushrif vs Sanjay Mandlik
Hasan Mushrif vs Sanjay Mandlikesakal
Summary

‘एका घरात अशी धुसपूस होत असते आणि ती लगेचच मिटतही असते’, अशी प्रतिक्रिया याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

कोल्हापूर : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी मंजूर केलेले कागल तालुक्यातील रस्त्याचे काम अडवले आहे. केवळ एका मर्जीतील ठेकेदाराला सांभाळण्यासाठी हा सारा प्रकार सुरू असल्याचा आरोप शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केला.

Hasan Mushrif vs Sanjay Mandlik
Chandrakant Patil : लोकसभा निवडणुकीत NDA च्या 325 पेक्षा जास्त जागा निवडून येतील; चंद्रकांत पाटलांना विश्वास

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संजय पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत जाब विचारला. या वेळी त्यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली.

जमादार यांच्यासह मंडलिक गटाचे कार्यकर्ते पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे या कामाबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते. या वेळी संबंधित अधिकारी समोर येताच काम कुणी थांबवले आहे, असा प्रश्न जमादार यांनी विचारला. पण, त्यांच्याकडून टाळाटाळ झाली. मात्र, काही वेळाने मंत्री मुश्रीफ यांनी या कामाची निविदा रद्द करण्यास सांगितल्याचे ते म्हणाले आणि श्री. जमादार व मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

Hasan Mushrif vs Sanjay Mandlik
पुसेसावळी दंगली प्रकरणात विक्रम पावसकरांना अडकवण्याचं षडयंत्र; हिंदुत्ववादी संघटनांचा जशास तसं उत्तर देण्याचा इशारा
Hasan Mushrif Sanjay Mandlik
Hasan Mushrif Sanjay Mandlikesakal

माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर येऊन याबाबतची माहिती देण्यासाठी रेटा लावला. त्यामुळे बराच काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव राहिला. जमादार म्हणाले, ‘हणबरवाडी येथील कडगाव, बेकनाळ, बाळेघोल येथील रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया जून महिन्यात पूर्ण झाली आहे. पण, एका ठेकेदाराच्या मर्जीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी वर्कऑर्डर देत नाहीत. त्याबाबत त्यांना विचारले असता ते मंत्री श्री. मुश्रीफ यांना भेटा, असे सांगतात.

Hasan Mushrif vs Sanjay Mandlik
Pusesawali Riots : पुसेसावळी दंगलीनंतर शिवेंद्रराजेंनी सातारकरांना केलं 'हे' आवाहन; म्हणाले, कठीण प्रसंगात डगमगून..

विकासकामासाठी निधी आणला म्हणून जाहिरात करणारे मंत्री मुश्रीफ असे सांगणार नाहीत. पण, अधिकारी व ठेकेदारांचीच मिलिभगत असावी आणि हे असे चालणार नाही. महिन्याभरात या अधिकाऱ्यांच्या कारभाराची पोलखोल आम्ही सर्वांसमोर करू.’ दरम्यान, ‘एका घरात अशी धुसफूस होत असते आणि ती लगेचच मिटतही असते’, अशी प्रतिक्रिया याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Hasan Mushrif vs Sanjay Mandlik
Prakash Awade : 'पोलिस ठाण्यात गुंडांना सौजन्याने खुर्ची मिळते'; आमदार आवाडेंनी अधीक्षकांसमोरच काढले वाभाडे

राष्ट्रवादीला बरोबर घेऊन अडचण

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गतिमान सरकार असल्याचे सांगतात. विविध कामांसाठी ते निधीही देतात. पण, ही कामे होत असताना स्थानिक पातळीवर असे होत असेल तर राष्ट्रवादीला बरोबर घेऊन अडचणच झाली’, असाही आरोप जमादार यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com