Kolhapur Bus : 55 प्रवासी घेऊन जाणाऱ्या कोल्हापूर-रत्नागिरी एसटीच्या इंजिनला लागली आग; बसमध्ये उडाला गोंधळ

काही प्रवाशांनी तत्काळ रत्नागिरी पालिकेच्या अग्निशमन दलाला कळविले. १० मिनिटांतच पालिकेचा बंब घटनास्थळी दाखल झाला.
Kolhapur-Ratnagiri ST Bus Fire
Kolhapur-Ratnagiri ST Bus Fireesakal
Summary

प्रवाशांनी आपल्याकडील बाटल्यांमधील पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बंबाने आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळविल्यामुळे आगीमुळे बस पेट घेण्यापासून बचावली.

रत्नागिरी : एसटी महामंडळाच्या कोल्हापूर (ST Corporation Kolhapur) आगाराची कोल्हापूर-रत्नागिरी ही ५५ प्रवासी घेऊन रत्नागिरीत येत होती. अचानक इंजिनला आग लागल्याने गोंधळ उडाला. परंतु, चालकाने प्रसंगावधान दाखवत एसटी बाजूला घेऊन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. पालिकेच्या अग्निशमन विभागानेही तत्परता दाखवत तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविले.

रत्नागिरी-हातखंबा मार्गावरील रेल्वेस्थानक फाट्यानजीक गयाळवाडी येथे ही घटना काल (सोमवार) दुपारी सव्वादोन वाजता घडली. कोल्हापूर आगाराचे चालक सुहास शिंदे हे कोल्हापूर-मलकापूरमार्गे रत्नागिरी एसटी घेऊन वाहक एस. एस. मराठे यांच्यासमवेत रत्नागिरीकडे निघाले होते. बसमध्ये ५५ प्रवासी होते.

Kolhapur-Ratnagiri ST Bus Fire
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेऊन सत्ता भोगणाऱ्यांनी मराठ्यांना सातत्यानं आरक्षणापासून वंचित ठेवलं; उदयनराजेंचा आरोप

दुपारी कारवांचीवाडी येथे काही प्रवासी (Passengers) उतरल्यानंतर बस मार्गस्थ झाली. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने बसचा वेग कमी होता. अचानक गयाळवाडी येथे बसच्या गिअर बॉक्समधून अचानक धूर येऊ लागला. बसमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच चालक सुहास शिंदे यांनी बस रस्त्याच्या बाजूला घेतली. इंजिनला आग लागल्याची कल्पना त्यांनी वाहक एस. एस. मराठे यांना दिली. त्यांनी बसच्या आपत्कालीन दरवाजा उघडून आतील सुमारे ५५ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.

काही प्रवाशांनी तत्काळ रत्नागिरी पालिकेच्या अग्निशमन दलाला कळविले. १० मिनिटांतच पालिकेचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत इंजिनसह चालकाची सीट जळून खाक झाली होती. प्रवाशांनी आपल्याकडील बाटल्यांमधील पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बंबाने आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळविल्यामुळे आगीमुळे बस पेट घेण्यापासून बचावली.

Kolhapur-Ratnagiri ST Bus Fire
कोल्हापूर शहराची लवकरच हद्दवाढ? अजितदादांनी हद्दवाढीचा चेंडू पुन्हा ढकलला स्थानिक नेत्यांच्या कोर्टात!

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले. हवालदार भितळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक सुहास शिंदे यांनी या घटनेची माहिती एसटीच्या रत्नागिरी, कोल्हापूर विभागाला दिली. त्यानंतर रत्नागिरी आगाराचे काही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com