कळंबा येथे गळती काढण्यासाठी केलेल्या खोदाईने रस्ताच बंद

 Excavation at Kalamba closed the road
Excavation at Kalamba closed the road
Updated on

कळंबा, कोल्हापूर : येथील पश्‍चिम भाग उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली होती. गळती काढण्यासाठी जेसीबी यंत्राच्या साह्याने अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदले होते. मात्र गळती काढण्याचे काम पूर्ण होऊन दोन महिने संपले तरीही पाणी पुरवठा विभागाने खड्डे मुजण्याचे काम अर्धवटसोडून दिले आहे. बापूराम नगरमधील विद्या वसंत पार्ककडे जाणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. 
अमृत योजनेमधून येथील उपनगरांत ड्रेनेज लाईन बसवण्याचे काम सुरू केले आहे. भूमिगत पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी टाकल्या आहेत. त्यामुळे रस्ते खुदाई वेळी शिंगणापूर पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीला जेसीबी यंत्राचा धक्का लागल्यामुळे व पाणीपुरवठ्याचा दाब वाढल्यामुळे गळती लागली होती. म्हणून पाणीपुरवठा विभागाने दत्तोबा शिंदेनगर, बापू रामनगर, विद्या वसंत पार्क येथील जल वाहिनीच्या गळतीचे काम हाती घेतले होते. गळती काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गळतीसाठी खोदण्यात आलेले खड्डे न बुजवता उघड्यावर सोडून दिले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा झाला असून शाळकरी मुले व दुचाकीस्वार घरून या खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. तसेच त्यामध्ये सांडपाणी तुंबून दलदल निर्माण झाली असून डास, माशांचा उपद्रव वाढला आहे. 

अधिकाऱ्याची उडवाउडवीची उत्तरे 
खड्डे बुजवण्यासाठी येथील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी अनेक वेळा संपर्क साधला आहे. मात्र या अधिकाऱ्यांनी जेसीबी यंत्र दुसऱ्या प्रभागात कामासाठी लावले आहे. ते मिळाल्यानंतर खड्डे मुजवतो.असे गेली दोन महिने सांगत आहे. 


विद्या वसंत पार्कला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर महापालिका पाणीपुरवठा विभागाने दोन महिन्यापूर्वी गळती काढण्यासाठी खुदाई केली होती. पण गळतीचे काम पूर्ण झाले तरीही नमुजवता खड्डा उघड्यावर सोडला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. 
- राजीव बकरे, नागरीक. 

संपादन यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sainik Takli garment industry jobs
Gokul election voter list 2026 in Kolhapur
Hupari wife attack case
Why is Gokul milk union election delayed?
Marathi News Esakal
www.esakal.com