
हुपरी: करणी झाली असल्याची भीती घालून तसेच शेतातील गुप्तधन काढून देण्याचा बहाणा करून पनवेलमधील एका कुटुंबास ३५ तोळे सोने व रोख पाच लाख, असा तब्बल चाळीस लाख रुपयांना गंडा घातलेल्या संकेश्वर तालुक्यातील एका भोंदूबाबास पनवेल पोलिसांनी हुपरी येथून अटक केली. तौफिक फकरुद्दीन मुजावर (वय २८, रा. सोलापूर, ता. संकेश्वर जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याने हुपरी परिसरात विक्री केलेले पस्तीस तोळे सोने,, तसेच पाच लाख रुपयांची रक्कम असा चाळीस लाख रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.