

कोल्हापुरात ऊसदराच्या मागणीवरून शेतकरी संतप्त झाले असून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
esakal
Kolhapur Sugar : ऊस दराच्या प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून, आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली.