Sugarcane Price 2025 : उसाला दर पाहिजे पण आंदोलन नको, शेतकऱ्यांची मानसिकता; यंदा आंदोलन पेटणार का?

Farmers Protest Kolhapur : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू करण्यावर अद्याप चर्चाच नसल्याने शेतकरी, कारखानदारांमध्ये अस्वस्थता आहे.
Sugarcane Price 2025

Sugarcane Price 2025

esakal

Updated on
Summary

हंगाम सुरू न होण्यामुळे अस्वस्थता:

कर्नाटकातील साखर कारखाने सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कारखाने अद्याप सुरू नाहीत, ज्यामुळे शेतकरी आणि कारखानदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

उसाच्या वाढीवरील नैसर्गिक अडथळे:

लहरी हवामान, हुमणी व तांबेरा रोग यामुळे उसाची वाढ खुंटली असून, उत्पादन आणि उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकारात्मक उपाय व मागणी:

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील प्रशासन, कारखानदार आणि संघटनांनी आंदोलनाशिवाय हंगाम सुरू करण्यासाठी एकमताने प्रयत्न करणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतकरी आणि कारखानदारांचे हित सुरक्षित राहील.

Sugarcane MSP Demand : दसऱ्याच्या मुहूर्तावर कर्नाटकातील साखर कारखाने सुरू करण्याच्या हालचाली असताना, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू करण्यावर अद्याप चर्चाच नसल्याने शेतकरी, कारखानदारांमध्ये अस्वस्थता आहे. लहरी हवामान, रोगराई, उसाची खुंटलेली वाढ, घटणारे उत्पादन आणि सहाजिकच याचा उत्पन्नावर होणारा परिणाम या सर्व बाबी यावर्षीच्या हंगामावर चिंतेचे ढग निर्माण करणाऱ्या आहेत. त्यामुळे ‘दर हवा, पण आंदोलन नको’ अशी मानसिकता शेतकऱ्यांची आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com