कोल्हापुरात डिस्‍टिलरीसाठी हवाई अंतराची अट

केंद्र सरकारचा महत्त्‍वपूर्ण निर्णय; २५ किलोमीटरच्या आत दुसरे युनिट नाही
Sugar Factory
Sugar FactorySakal
Summary

केंद्र सरकारचा महत्त्‍वपूर्ण निर्णय; २५ किलोमीटरच्या आत दुसरे युनिट नाही

कोल्हापूर : साखर कारखान्यांबरोबरच(sugar factory) आता यापुढे इथेनॉल निर्मितीच्या डिस्‍टिलरी उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट घातली आहे. केंद्र सरकारने(central government) हा निर्णय आज जाहीर केला. यामुळे अस्तित्‍वात असलेल्यांबरोबरच नव्या सुरू होणाऱ्या डिस्‍टिलरीसाठी चांगले दिवस येणार असून, या निर्णयाने साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. देशात आणि राज्यातही दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतर कायद्याने निश्‍चित केले आहे.

देशात दोन कारखान्यांमधील अंतर १५ किलोमीटर, तर महाराष्ट्रात ते २५ किलोमीटर आहे. पण, डिस्‍टिलरी उभारणीसाठी ही अट नव्हती. अलीकडे केंद्र सरकारने इंधनात इथेनॉल मिश्रणाला प्राधान्य दिले आहे. मिश्रणाचे प्रमाण १० टक्के करण्याचा तर २०१५ पर्यंत ते २० टक्के करण्याचा केंद्राचा निर्धार आहे. त्यातून आवश्‍यक तेवढीच साखर उत्पादन(production of sugar) होईल हा उद्देश आहे. आज साखरेच्या उत्पादनाच्या प्रमाणात बाजारात मागणी नाही. त्याचा फटकाही कारखान्यांना बसत आहे. त्यामुळे इंधनात इथेनॉल(Ethanol ) मिश्रणावर भर दिला आहे.

Sugar Factory
कोल्हापूर : सोळा शेतकऱ्यांनी उभारले आधुनिक गुऱ्‍हाळघर

महाराष्ट्रात काही साखर कारखान्यांच्या स्वतःच्या डिस्‍टिलरी आहेत. काही खासगी व्यक्तींचेही प्रकल्प आहेत. खासगी उद्योगांकडून इथेनॉल निर्मितीसाठी लागणारे बी व सी हेवी मोलॅलिससह साखरेची खरेदी साखर कारखान्यांकडून केली जाते. साखर कारखान्यांना हवाई अंतराची अट होती. पण, डिस्‍टिलरी साठी ती नव्हती. त्यातून मोलॅसिस खरेदीसाठीची मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. राज्य व केंद्रीय साखर संघानेही डिस्‍टिलरीसाठी हवाई अंतराची अट लागू करण्याची मागणी केली होती.

Sugar Factory
कोल्हापूर : सव्वा तीन कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त

डिस्‍टिलरींची संख्या वाढली तर त्यांची अवस्था मुंबईतील कापड गिरण्यांसारखी होईल. इथेनॉल निर्मितीसाठी आवश्‍यक कच्चा माल उपलब्धतेवरही परिणाम होणार आहे. त्यातून डिस्‍टिलरी बंद पडण्याचा धोका आहे. डिस्‍टिलरी उभारणीसाठी केंद्र सरकारकडून अनुदानावर कमी व्याज दराने कर्ज पुरवठा केला जातो. कच्च्या मालाअभावी अशा डिस्‍टिलरी बंद पडल्या तर या कर्जाच्या वसुलीचाही गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून व साखर संघांची मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने डिस्‍टिलरीसाठीही २५ किलोमीटर हवाई अंतराची अट घालण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय अन्ऩ व नागरी पुरवठा विभागाचे सहसंचालक जितेंद्र ज्युयेल यांनी यासंदर्भातील आज आदेश काढले.

खांडसरीकडून कच्चा माल नाही

डिस्‍टिलरीचालकांना खांडसरीकडून इथेनॉल(Ethanol) निर्मितीसाठी लागणारे बी व सी हेवीसह उसाचा रस हा कच्चा माल खरेदी करता येणार नसल्याचे या आदेशात म्हटले आहे. खांडसरी उभा करण्यासाठी केंद्राकडून हवाई अंतराची अट नाही. परिणामी, राज्यात असलेल्या सुमारे ६० खांडसरीतून हा कच्चा माल जाणार नाही.

नव्या प्रस्तावांनाही अट लागू

राज्यात गेल्या वर्षी सुमारे ११७ प्रकल्प सुरू होते. यावर्षी त्यात नव्याने २८ प्रकल्पांची भर पडली आहे. याशिवाय, आणखी काही प्रकल्प परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशा नव्या प्रस्तावांनाही ही नवी अट लागू आहे.

Sugar Factory
चंद्रकांत पाटील यांचे ज्ञान अगाध; मुश्रीफांचा खोचक टोला

साखर संघाकडूनच(Sugar news ) ही मागणी लावून धरली होती. हवाई अंतराची अट नसल्याने डिस्‍टिलरींची संख्या वाढण्याचा धोका होता. त्यातून कच्‍च्‍या मालाचा(raw material) प्रश्‍न निर्माण झाला असता. आता अस्तित्त्वात असलेल्या व नव्याने सुरू होणाऱ्या डिस्‍टिलरीच (distillery)नव्या नियमांमुळे पूर्ण क्षमतेने चालतील.

-पी. जी. मेढे, साखर उद्योगातील अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com