

Football Messi India
esakal
Kolhapur Football Talents : शालेय फुटबॉलपटू आर्यन पोवार, आराध्य चौगले, रुद्र स्वामी, तर मुलींमध्ये साक्षी नावळे, दिव्या गायकवाड हे पाचजण रविवारी (ता. १४) अर्जेंटिनाचा विख्यात फुटबॉलस्टार लिओनल मेस्सी याच्यासोबत मुंबईत खेळणार आहेत. या सर्वांचे महाराष्ट्र राज्य शासनाने ‘स्कॉलरशिप ऑफ प्रोजेक्ट महादेवा’ याअंतर्गत पाच वर्षांसाठी पालकत्व घेतले आहे.