
Gokul Dudh Sangh
esakal
१३६ कोटींची आर्थिक भेट – गोकुळ दूध संघाने १ ऑक्टोबर २०२५ रोजी ८ हजार १२ दूध संस्था आणि सुमारे ५ लाख सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात दरफरक आणि इतर लाभ जमा करण्याची घोषणा केली आहे.
दुध दरफरक – म्हैस दुधाला प्रतिलिटर २.४५ रुपये, तर गायीच्या दुधाला १.४५ रुपये दरफरक दिला जाणार असून, व्याज, डिबेंचर व डिव्हिडंड या स्वरूपातही लाभ मिळणार आहेत.
अतिरिक्त सुविधा – पशुवैद्यकीय सेवा, कृत्रिम रेतन, वैरण विकास, किसान विमा यांसाठी ४२ कोटींचा खर्च; तसेच गोकुळचे दैनंदिन संकलन १८.५९ लाख लिटर आणि विक्री विक्रम २३.६३ लाख लिटरवर पोहोचली आहे.
Gokul Dairy Diwali Bonus : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यावर्षीदेखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दूध दर फरकाच्या माध्यमातून मोठी आर्थिक भेट जाहीर केली आहे. संघाकडून १३६ कोटी ०३ लाख रुपयांचा अंतिम दूध दर फरक व इतर लाभ थेट दूध संस्थांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून, ही रक्कम १ ऑक्टोबर २०२५ रोजी अदा केली जाणार आहे, अशी माहिती गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली.