
Gokul Dairy Politics : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) सभासद शेतकऱ्यांसह सचिवांवर ऑफरचा धमाका सुरू केला आहे. आगामी वार्षिक सर्वसाधारण सभा, पंचवार्षिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय होत आहेत. लवकरच जिल्हा बॅंकेकडून म्हैस खरेदीसाठी दहा हजारांचे अनुदानही देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऑफरमध्ये सभासदांचे हित असले तरीही वाढीव संचालकांच्या मुद्यांवर सर्वसाधारण सभा आणि निवडणूक गाजणार असल्याचे संकेत आहेत.