
Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकुळ) निवडणूक म्हणजे ठरावधारक सभासदांना चांगले दिवस आल्याचे संकेत मिळतात. यावेळी मात्र वर्षभर आधीच संभाव्य सभासदांना केवळ चांगले नव्हे, तर चक्क लखपती करणारे दिवस आल्याची चर्चा सुरू आहे. भेटीसाठी येईल त्या इच्छुकांना ‘मी तुमच्यासोबतच हाय’ असे म्हणत हे चलाख संभाव्य ठरावधारक ‘‘टोकन’’ स्वीकारून लखपती होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.