Kolhapur Gokul election
esakal
कोल्हापूर : सहा महिन्यांपासून ‘गोकुळ’च्या कारभारावरून झालेल्या आरोप-प्रत्यारोप आणि विरोधकांकडून घातली जात असलेली भावनिक साद, त्याची जिल्ह्यात सुरू असलेली चर्चा यामुळे या निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’चा मोठा धोका आहे. याचा धसका घेत सर्वसाधारण गटातून विजयी झालेल्या काहींनी थेट राखीव गटातून उमदेवारीची मागणी केली आहे.
पाच वर्षांपूर्वी ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाले, त्यावेळी सर्व महाडिक विरोधक एकत्र आले. यावेळी राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे पडसाद ‘गोकुळ’मध्येही दिसत आहेत. त्यातून पाच वर्षांपूर्वी आमदार सतेज पाटील वगळता महाडिक यांना विरोध केलेले सर्व त्यांच्यासोबतच आहेत; पण संस्था पात्र-अपात्र ठरवण्याच्या कारणांवरून महायुतीतील संघर्षही चव्हाट्यावर आला. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत गेले. त्यातून न्यायालयीन लढाई लढावी लागलेल्या नाराज १४०० संस्थांनी मेळावा घेऊन त्रास दिलेल्या ‘शक्ती’ विरोधात एल्गार केला होता.
महायुतीत एका बाजूला एकमेकांना शह देण्याचे राजकारण सुरू असताना त्यांच्या विरोधात लढत असलेल्या आमदार पाटील यांनी मात्र जिल्हाभर फिरून ठरावदारांचे मेळावे घेत त्यांना भावनिक साद घातली आहे. महायुतीतच एकीकडे एकमेकांचा ‘काटा’ काढण्याची चर्चा सुरू असली तरी विरोधकांकडून सुरू असलेल्या प्रचारामुळे ‘गोकुळ’च्या राजकारणात काहींना ‘धडा’ शिकवण्याची भाषा सोशल मीडियावर सुरू आहे.
त्याचा धसका घेऊन खुल्या गटातील काहींनी थेट राखीव गटातून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात एका माजी अध्यक्षांसह ज्येष्ठ संचालकांचा समावेश आहे. उमेदवार निश्चितीनंतर कोणी धसका घेतला हे स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.