Gokul Election Office : निवडणूक कार्यालयात नियोजनाचा फज्जा पोलिस, कार्यकर्ते, इच्छुकांत वादावादी; दूध उत्पादक रखरखत्या उन्हात

Planning Issues at Gokul Election Office in Kolhapur : कोल्हापुरातील रमणमळा येथील गोकुळ निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाल्यानंतर नियोजनावरून वाद निर्माण झाला.
Gokul Election Office

Gokul Election Office

esakal

Updated on

कोल्हापूर : रमणमळा येथील गोकुळच्या निवडणूक कार्यालयात आज नियोजनाचा फज्जा उडाला. पोलिस आणि कार्यकर्ते, इच्छुकांत वादावादी झाली. अपुरी व्यवस्था असल्यामुळे दूध उत्पादकांना रखरखत्या उन्हात उभे राहावे लागले. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर सर्वांनीच तीव्र नाराजी व्यक्त केली.

सर्व काही नियमांत झाले पाहिजे, काटेकोर झाले पाहिजे, असा आव आणला जात असताना आज चक्क इच्छुक उमेदवारांच्या सूचकांनाच निवडणूक कार्यालयात प्रवेश दिला नाही. त्यामुळे त्यांचा पोलिसांशी थेट वाद झाला. ठराविक इच्छुकांसह एकाचवेळी चार-पाच व्यक्ती कार्यालयात प्रवेश करत होत्या. मात्र, ठराविकांनाच अडविले जात होते. त्यामुळे ढिसाळ नियोजनावर नाराजी व्यक्त केली. प्रताप कावणेकर यांचे सूचक भिवाजी चौगले यांना पोलिसांनी प्रवेश दिला नाही.

Gokul Election Office
Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

त्याचवेळी इतर इच्‍छुकांसोबत चार-पाच व्यक्ती आतमध्ये गेल्या. त्यामुळे चौगले यांनी पोलसांना धारेवर धरले. तेथे काही प्रमाणात तणाव निर्माण झाला. याचवेळी केवळ शंका विचारण्यासाठी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ, विश्‍वास पाटील, माजी संचालक शशिकांत पाटील-चुयकेर हे बाहेर जाण्याच्या मार्गावरून आत जात होते.

तेथे परगावाहून बंदोबस्तासाठी आलेल्या महिला पोलिसांनी त्यांनाही अडविले होते. त्यांच्याशीही ‘तू-तू मै-मै’ झाले. अखेर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाहेर आले. येथेच भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष उत्तम कापसे यांनाही पोलिसांनी तेथून हटकवले. यावर त्यांनी अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना आता सोडले काय? असा सवाल केला.

यामुळे तणावाचे वातावरण झाले. आमदार अशोक माने हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे स्कार्फ घालून निवडणूक कार्यालयात ‘बाहेर’ जाण्याच्या मार्गावरूनच आत गेले. येथे पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना बाजूला करून दहा-पंधरा जण निवडणूक कार्यालयात गेले. यामुळेही काही वेळ गोंधळ झाला. पोलिसांनी पत्रकारांवर अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना इतरांनी समजून सांगितल्यावर त्यांनी माघार घेतली.

Gokul Election Office
Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

निवडणूक यंत्रणेसाठी सुविधा; पण उत्पादकांना नाही

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज गर्दी होती. मंडप आणि बैठकीसाठी असलेल्या खुर्च्या अपुऱ्या पडल्या. त्यामुळे दूध उत्पादकांसह इतरांना रखरखत्या उन्हात थांबावे लागले. निवडणूक यंत्रणेसाठी सर्व काही सुविधा; पण उत्पादकांना नाही, त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर दूध उत्पादक सभासदांसह भिवाजी चौगले यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com