ब्रेकिंग : विश्वास पाटील गोकुळच्या अध्यक्षपदी

गोकुळला नवे वैभव देणार; दोन वर्षांनी राजीनामा देणार
ब्रेकिंग : विश्वास पाटील गोकुळच्या अध्यक्षपदी

कोल्हापूर : संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) (gokul election) नूतन अध्यक्षपदी (gokul chairman) विश्वास नारायण पाटील (vishwas patil) याच्या नावावर पालकमंत्री सतेज पाटील (satej patil)आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी आज शिक्का मोर्तब केले. नवनिर्वाचित संचालकांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

काल तब्बल अडीच तास बैठक घेऊन संचालकांची मते जाणून घेतली होती. मात्र निर्णय झाला नव्हता. त्यामुळे आज सकाळी पुन्हा सर्व संचालकांशी मोबाइलद्वारे चर्चा करून विश्वास पाटील यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर चिठ्ठीव्दारे हे नाव बंद लिफाफ्यात गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात पाठवण्यात आले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी श्री. पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

ब्रेकिंग : विश्वास पाटील गोकुळच्या अध्यक्षपदी
कोविड सेंटरमधून दोन कोरोनाबाधित बंदी पसार; कोल्हापूरातील घटना

यावेळी पाटील म्हणाले, ‘‘गोकुळ दुध उत्पादकांना प्रतिलीटर दोन रूपये दरवाढ देण्याची घोषणा केली होती. ती लवकरच पूर्ण केली जाईल. गोकुळ दुध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. गोकुळला नवे वैभव प्राप्त करून दिले जाईल.’’ यावेळी सत्तारूढमधील सर्व संचालक पिवळे फेटे बांधून सभागृहात उपस्थित होते. निवडीनंतर दोन्हीही मंत्र्याचा जयघोष केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com