
Gokul Dudh Sangh
esakal
‘गोकुळ’मध्ये ठरावांसाठी स्पर्धा: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मध्ये मतदारयादीत समाविष्ट होण्यासाठी ‘ठराव’ म्हणजे एकेक मत मानले जाते. त्यामुळे या ठरावांची आकडेवारी खंडेनवमीनंतर जुळवाजुळव करण्याचे नियोजन असून, ठराव मिळविण्यासाठी नेत्यांमध्ये तीव्र स्पर्धा आहे.
टोकण व बोलीची धडपड: ठरावांसाठी नेत्यांकडून टोकण (आगाऊ रक्कम) दिली जात आहे. काही गावांत ठराव मिळविण्यासाठी बोली, लिलावसारखी परिस्थिती निर्माण झाली असून, कोरे ठराव (नाव न घालता) घेण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
अवसायनातील संस्थांवर लक्ष: मतदारयादीपूर्वी अवसायनातील संस्थांना सक्रिय करण्यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. अशा संस्था ७० असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष संख्या १४५ असल्याची शासकीय माहिती आहे.
Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मध्ये ‘लाख’मोलाच्या ठरावांच्या आकडेवारीची जुळवाजुळव खंडेनवमीनंतर करण्याचे नियोजन आहे. काही तालुक्यांतील ठरावांसाठी तीन नेत्यांकडून मनधरणी झाली आहे. अवसायनातील संस्थांचे अस्तित्व निर्माण करून त्यांचेही ठराव मिळविण्यासाठीचीही धडपड गोपनीय पद्धतीने सुरू झाली आहे.