Satej Patil Gokul News : शासन नियुक्त ४ संचालक फक्त तीन महिने राहणार, सतेज पाटलांनी सांगितली राजकारणापलीकडची गोष्ट

Kolhapur Gokul News : गोकुळ दूध संघातील शासननियुक्त चार संचालकांच्या नियुक्तीबाबत सतेज पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. हे चार संचालक केवळ तीन महिनेच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Satej Patil Gokul News political statement

Satej Patil Gokul News political statement

esakal

Updated on: 

Gokul Government Nominated Directors : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक काल पार पडली. महायुतीचे राजेश पाटील अध्यक्ष झाले असले, तरी संघातील सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत. आमदार सतेज पाटील यांनी चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीमागील कथित राजकीय रणनीतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे चार संचालक केवळ तीन महिन्यांसाठी नियुक्त करण्यात आले असून, त्यानंतर पराभूत झालेल्या उमेदवारांना संचालक करण्याची तयारी असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यामुळे गोकुळमधील सत्तासमीकरणांसह शासननियुक्त संचालकांच्या भवितव्याबाबत नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...