Gokul dairy election news : गोकुळ दूध संघाची निवडणूक लांबणीवर, १२०० दूध संस्थांच्या निर्णयानंतरच निवडणुका; कोर्टाने दिले थेट आदेश

Kolhapur cooperative politics : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. १२०० दूध संस्थांच्या निर्णयानंतरच निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे थेट आदेश कोर्टाने दिले आहेत.
Gokul Dairy Election Postponed

Gokul dairy election kolhapur news

esakal

Updated on

Gokul Dairy Election Postponed : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीवर टांगती तलवार कायम राहिली असून निवडणुका लवकर घेण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. सुमारे १ हजार २०० दूध संस्थांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय प्रलंबित असताना निवडणुका कशा घेता येतील, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. याप्रकरणी पुढील सुनावणी २८ तारखेला ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांबाबत सध्या अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com