...तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार ; आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे अमित शहा यांना आव्हान

hasan mushrif amit shah kolhapur politics news
hasan mushrif amit shah kolhapur politics news
Updated on: 

कोल्हापूर - साखर कारखान्यांना थकहमी देताना कोणतीही गटबाजी झालेली नाही. याबाबत तक्रार करणारा एकही कारखानदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दाखवावा, आम्ही कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहोत, असे आव्हान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज श्री. शहा यांना दिले. 

दरम्यान, श्री. शहा यांनी महाविकास आघाडी सरकाबाबत केलेले वक्तव्य वैफल्यातून केले असल्याची टीकाही श्री. मुश्रीफ यांनी यावेळी केली. श्री. शहा यांनी काल कोकणात केलेल्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यांनी बंद खोलीत दिलेले आश्‍वास खरे असावे, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले. 

माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी कोकणात उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्‌घाटन श्री. शहा यांच्या हस्ते काल (ता. 7) झाले. या कार्यक्रमात श्री. शहा यांनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेला टिकेचे लक्ष्य केले. याबाबत श्री. मुश्रीफ यांना विचारले असता ते बोलत होते. 

ते म्हणाले,"भाजपाच्या काही नेत्यांनी साखर साखर उद्योबाबाबत श्री. शहा यांच्याकडे काही तक्रारी केल्या. यावरून कारखानदारांवर अन्याय होत असल्याची टीका श्री. शहा यांनी केली. मात्र, त्यांचा हा आरोप चुकीचा आहे. भाजपा सत्तेवर येणार नाही असे वाटत असल्याने ते तक्रारी करत आहेत. त्यांनी अभ्यास करून बोलायला हवे.तक्रार करणाऱ्या कारखानदारांना केंद्राकडून मदत हवी असेल म्हणूनच ते तक्रार करत असतील.' 

"वारंवार तक्रार करून सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून सरकार भक्कम आहे. हे सरकार पाडण्याचे धाडस कोण करणार नाही. जो हे धाडस करेल त्यांची अनामत जप्त होईल, असा टोलाही श्री. मुश्रीफ यांनी लगावला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com