Rain Update : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार; सात बंधारे पाण्याखाली, पंचगंगेच्या पाणीपातळीत 4 फुटांची वाढ

जिल्ह्यात दिवसभर राधानगरी, वारणा, पाटगाव आणि कुंभी धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.
Panchganga River
Panchganga Riveresakal
Summary

राजाराम, शिंगणापूर, रुई, इचलकरंजी, सुर्वे, तेरवाड आणि शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर : पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस (Heavy Rain in Kolhapur) झाल्याने सकाळी ७ ते सायंकाळी ७ दरम्यान पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणीपातळी तब्बल ४ फुटांनी वाढली. राजाराम, शिंगणापूर, रुई, इचलकरंजी, सुर्वे, तेरवाड आणि शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

चंदगड तालुक्यातील घटप्रभा मध्यम प्रकल्प काल (शुक्रवार) पहाटे ४ वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे. जिल्ह्यात दिवसभर राधानगरी, वारणा, पाटगाव आणि कुंभी धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे.

Panchganga River
NCP Crisis : राष्‍ट्रवादीचं 'घड्याळ' चिन्ह कोणाला मिळणार, अजितदादा की शरद पवार? देसाईंनी स्पष्टच सांगितलं..

जिल्ह्यात लहान-मोठे असे एकूण १५ प्रकल्प आहेत. या एकाही प्रकल्पातून अद्याप एक क्युसेकही पाणी सोडले जात नाही. दरम्यान, सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान, राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. सकाळी ७ वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी १४ फूट ०१ इंच होती. हीच पाणीपातळी सायंकाळी ७ पर्यंत १७ फूट २ इंचावर जाऊन पोचली.

Panchganga River
Koyna Dam : कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; महाबळेश्‍वरला 157 मिलिमीटर पावसाची नोंद

त्यामुळे या बंधाऱ्यावरून सकाळी ६ हजार १२७ क्युसेक, तर सायंकाळी ८ हजार १५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत राहिला. जिल्ह्यात पाणलोट क्षेत्राव्यतिरिक्त इतर ठिकाणीही दमदार पाऊस झाला. त्यामुळे पेरण्यांना गती आली आहे. मृग नक्षत्राचा मुहूर्त साधून जून महिन्यात पेरणी केलेल्या भात, सोयाबीन पिकाला या पावसाने तरतरी येणार आहे. उसाला टाकलेली लागवड पोषक ठरणार असल्याचे चित्र आहे.

Panchganga River
Hasan Mushrif : 'शरद पवार आमचे दैवत, सगळ्या पालख्या आमच्या विठ्ठलाकडं गेल्याशिवाय राहणार नाहीत'

तुळशी धरण क्षेत्रात पावसाचा जोर

धामोड : सकाळपासून येथील तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. २४ तासांत २९ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे. केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला प्रकल्प ३५ टक्के भरला आहे. दरम्यान, तुळशी धरणातून सोडण्यात आलेला नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणाची पाणीपातळी सध्या ५९८.९० मी असून पाणीसाठा-२४.६२६ दलघमी इतका आहे. धरण क्षेत्रात आजअखेर एकूण पाऊस - ४११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

‘भोगावती’च्या पाणीपातळीत वाढ

राशिवडे बुद्रुक : पावसाने जोर धरल्याने रेंगाळलेल्या शेतीकामांना गती आली आहे. दीर्घकाळ रेंगाळलेली भात रोप लागण आता गतीने होणार आहे. याशिवाय डोंगरी खरीप पिकांची पेरणी झपाट्याने होऊ लागली आहे. ओढ्यांना पाणी सुरू झाल्याने भोगावती नदीची पाणीपातळीही आज वाढली आहे.

Panchganga River
NCP Crisis : कोणाला पाठिंबा न देताच 'हा' आमदार युरोप दौऱ्यावर? पाटलांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यातच!

जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा करण्याची क्षमता आणि आजचा पाणीसाठा टीएमसीमध्ये

धरण/प्रकल्प एकूण पाणीसाठा क्षमता आजचा पाणीसाठा

  • राधानगरी ८.३६ २.६७

  • तुळशी ३.४७ ०.८७

  • वारणा ३४.३९ १२.२६

  • दूधगंगा २५.३९ २.६५

  • कसारी २.७७ ०.८२

  • कडवी २.५१ ०.८७

  • कुंभी २.७१ १.१३

  • पाटगाव ३.७१ १.१८

  • चिकोत्रा १.५२ ०.४३

  • चित्री १.८८ ०.३३

  • जंगमहट्टी १.२२ ०.३१

  • घटप्रभा १.५६ १.५६

  • जांबरे ०.८१ ०.३५

  • आंबेओहोळ १.२४ ०.४०

  • कोदे लघू. पा. ०.२१ ०.१३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com