Kolhapur News: कोल्हापुरात पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमली आहे. औरंगजेबाचा संदर्भ देऊन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांचे अनेक कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमले आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी जमलेल्या नागरिकांची मागणी आहे.
कोल्हापुरातील काही तरुणांनी औरंगजेबाचं समर्थन करणारी पोस्ट स्टेटसवर ठेवले. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. संबंधित तरुणांवर कारवाई करा, अशी मागणी करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात लक्ष्मीपुरा पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली आहे.
उद्या कोल्हापूर बंद ठेवायचं अशी हाक द्यायचा विचार चालू आहे. कोल्हापुरातील काही युवकांनी औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे स्टेटस ठेवत, वादग्रस्त कॅपशनसह सामाजिक तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह स्टेटस ठेवले. त्यामुळे कोल्हापुरात वाद पेटला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.