
कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या शवागृहातील टाकून दिलेला बर्फ गटारात टाकून पुन्हा धुऊन थंड पाणी, नारळपाणी, लस्सी, मठ्ठा यासाठी वापरण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या घटनेचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती आला असून त्यात हा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे दिसून येतो.