

तावडे हॉटेलजवळ उभारलेली आणि तब्बल २८ वर्षे कोल्हापूरच्या अभिमानाचे प्रतीक ठरलेली स्वागत कमान अखेर पाडण्यात आली.
esakal
Kolhapur Gets Emotional : महापालिकेने तावडे हॉटेलजवळील स्वागत कमान २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज रात्री बारा वाजता जमीनदोस्त केली. त्यासाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह अन्य मोठी यंत्रणा कार्यरत होती. यावेळी बघ्यांची गर्दी तसेच रिल्ससाठी शूटिंग करणाऱ्यांची संख्या वाढल्याने पोलिसांची जादा कुमक मागवावी लागली.