धडधड वाढली : आता रुमाल, मास्क, बेडशीट उत्पादनाला येणार महत्त्व... 

The importance of handkerchiefs, masks, bedsheets will come
The importance of handkerchiefs, masks, bedsheets will come
Updated on

कोल्हापूर : कापड उद्योगाच्या बाजारपेठेत संभाव्य मागणी असलेल्या विविध उत्पादनांची बाजारपेठ काबीज करण्यासाठी शहरातील उद्योजक सरसावू लागले आहेत.

राज्यातील अन्य कापड उत्पादन केंद्रातील सद्यःस्थिती पाहता इचलकरंजी केंद्र अधिक सक्षम असल्याने बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्याची क्षमता येथे आहे. त्या दृष्टीने शहरातील यंत्रमागधारक हळूहळू पाऊल पुढे टाकत आहेत. 

कोरोनाच्या संसर्गामुळे यंत्रमाग उद्योग दीड महिन्याहून अधिक काळ ठप्प आहे. सद्यःस्थितीत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या उत्पादनाला अधिक मागणी असणार आहे. या दृष्टीनेच रुमाल, मास्क आणि बेडशीट यांच्या उत्पादनाला अधिक महत्त्व येणार आहे. ही सर्व उत्पादने तयार करण्याची क्षमता शहरातील उद्योगात आहे. 

साध्या यंत्रमागापासून आधुनिक यंत्रमागापर्यंत सर्व यंत्रसामुग्री शहरात आहे. तंत्रज्ञानातही या शहराने एक पाऊल पुढे टाकले आहे. मास्क आणि रुमालसाठी लागणाऱ्या कापडाला मोठी मागणी आहे. त्याचबरोबर मास्क निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विचारणा होत आहे. शहरातील सुमारे 20 ते 25 टक्के यंत्रमाग सुरू झाले आहेत. 


राज्यातील अन्य केंद्रांचा विचार करता सोलापूर आणि मालेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नजीकच्या काळात यंत्रमाग उद्योग सुरू होण्याची कमी शाश्‍वती आहे. भिवंडी केंद्र ठाणे जिल्हाअंतर्गत येत असून तो जिल्हाही रेड झोनमध्ये आहे. या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील आणि इचलकरंजी शहरातील रुग्णसंख्या कमी प्रमाणात आहे. येथील वैद्यकीय सुविधा आणि अन्य सोयीसुविधा चांगल्या असल्याने या सर्वांचा फायदा घेत येथील उद्योजक एक पाऊल पुढे टाकत आहेत. 

दृष्टिक्षेपात इचलकरंजी 
* शहरातील 20 ते 25 टक्के यंत्रमाग सुरू 
* कोरोनाचे रुग्ण केवळ दोनच 
* वैद्यकीय सेवेसाठी लागणारे उत्पादन शक्‍य 
* आधुनिक यंत्रमाग आणि तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर 
* रुमाल, मास्क आणि बेडशीटला मागणी 

उद्योगातील सद्यःस्थिती बिकटच आहे. तरीही संभाव्य मागणी वाढल्यास या ठिकाणच्या यंत्रमागधारकांना तत्काळ गती घेता येणे शक्‍य आहे. या संधीचा भविष्यात नक्कीच फायदा होईल. 
- सतीश कोष्टी, अध्यक्ष, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kagal Woman Dead Body News
Kolhapur  Paper Leak
Satej Patil statement on Gokul election
Pune MLC Election 2026 MVA seat
Marathi News Esakal
www.esakal.com