APMC Election: धक्कादायक! मतपत्रिकेसोबत निघाल्या ५०० च्या नोटा; उमेदवाराने वाटलेले...

आजकाल निवडणुकीत मतांसाठी पैसे वाटल्याचे अनेक प्रकार समोर येतात
APMC Election
APMC ElectionEsakal

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक मतमोजणीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मतपत्रिकेसोबत ५०० नोटा निघाल्या आहेत. उमेदवाराने वाटलेले पैसे मतदाराने परत केले आहेत.

आजकाल निवडणुकीत मतांसाठी पैसे वाटल्याचे अनेक प्रकार समोर येतात. मात्र हे दिलेले पैसे एका मतदाराने चक्क मतपेटीत टाकून परत केल्याची प्रकार कोल्हापूरमध्ये घडला आहे.

नेमकं काय घडलं?

कोल्हापूरमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणी दरम्यान कर्मचाऱ्यांना एक पाकिट आढळून आले. यामध्ये पाचशेच्या दोन नोटा आढळल्या. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर चर्चेला उधाणं आलं. हे पैसे निवडणूक आयोगाला जमा करावे अशी विनंती या मतदाराने केली आहे.

APMC Election
Amit Shah: शहांच्या मुंबईत येण्याने राजकीय घडामोडींना वेग; शिंदेंसह फडणवीसांसोबत पाऊण तास चर्चा

चिट्या लिहीत उमेदवारांना कानपिचक्या

आधी एक मतपत्रिकोसोबत दोन पाचशेच्या नोटा आढळल्यानंतर आता काही मतपत्रिकांमध्ये चिठ्ठ्या सापडल्या आहेत. या चिठ्ठ्यांमधून मतदारांनी निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांना चांगल्याच कानपिचक्या आणि सल्ले दिले आहेत.

APMC Election
Maharashtra Politics: पहाटेच्या शपथविधीबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा, म्हणाले अजित पवारांनी तेव्हा...

कोल्हापूरमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवाराने वाटलेले पैसे एका मतदाराने चक्क मतपेटीतून निवडणूक आयोगाला परत केले आहे. मतमोजणीदरम्यान कर्मचाऱ्यांना मतपत्रिकेसोबत दोनशे आणि पाचशेच्या नोटा आढळून आल्या. हे पैसे निवडणूक आयोगाला जमा करावे अशी विनंती या मतदाराने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com