
कोल्हापूर : गेल्या आठवड्यात छत्तीसगडवरून एक मुलगी कोल्हापुरात आली. मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या या मुलीची अवस्था फारच दयनीय अशी होती. कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तिच्याशी बोलून, तिचा घरचा पत्ता विचारला, पालकांचे संपर्क क्रमांक घेतले. पालक छत्तीसगडवरून कोल्हापुरात पोहोचण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागणार होता. या काळात तिची जबाबदारी कोण घेणार?, असा प्रश्न उभा राहिला. शेवटी कागलमधील एका सामाजिक संस्थेने, बेघर निवारा केंद्राने चार दिवस तिची काळजी घेतली. पालक आल्यानंतर तिला पाठविण्यात आले. हे एक प्रातिनिधिक उदाहरण.