esakal | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जावळीत बॉम्ब शोधक पथकाची तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जावळीत बॉम्ब शोधक पथकाची तपासणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जावळीत बॉम्ब शोधक पथकाची तपासणी

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर: गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मोठ्या संख्येने भक्त गणेश दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यांचे दर्शन भयमुक्त व्हावे यासाठी बॉम्ब शोधक व नाशक पथक /श्वान पथक सातारा यांनी जावळी तालुक्यातील मेढा पोलिस स्टेशन हद्दीत येणारे सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बसस्थानक मुख्य बाजारपेठ, गर्दीचे व महत्वाची संवेदनशील ठिकाणांची तपासणी आज मेढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांच्या नेतृत्वाखाली केली.

हेही वाचा: एफआरपी तीन तुकड्याविरोधात 'स्वाभिमानी'चे मिस्ड्‌ कॉलचे आवाहन

जावळी तालुक्यात शुक्रवारपासून सुरु झालेल्या गणेशोत्सवामध्ये विविध ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांच्या सुरक्षेला काही समाजकंटकांकडून धोका पोहचु नये यासाठी महत्वाच्या व गर्दीच्या तसेच गणेश मंडळांच्या ठिकाणी सातारा जिल्हा बॉम्ब शोधक व नाशक पथक /श्वान पथक कडून अत्याधुनिक यंत्राद्वारे तपासणि करत तसेच काही ठिकाणी समाजकंटक शांतता बाधीत करण्याचा प्रयत्न करतात.

त्यांचे प्रयत्न हाणुन पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दल सक्षम जरी असले तरी विशेष काळजी सातारा जिल्हा बॉम्ब शोधक नाशक पथक /श्वान पथक घेत आहे. हे पथक दररोज आपल्या नित्यनेमाने शहरातील महत्वाच्या ठिकाणी आपल्या रुद्र नावाच्या श्वानासोबत व आधुनिक यंत्राद्वारे तपासणी करतात.

आज श्री.भैरवनाथ गणेश उत्सव मंडळ केळघर येथे सातारा जिल्हा बॉम्ब शोधक नाशक पथक /श्वान पथक यांनी भेट देऊन गणेशोत्सव मंडळ चा आजूबाजुच्या संपूर्ण परिसरची तपासणी केली. व तेथून ते पथक तालुक्यातील ईतर ठिकाणी तपासणी करण्यासाठी रवाना झाले. यावेळी मेढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने, सातारा जिल्हा बॉम्ब शोधक व नाशक पथक/ श्वान पथक यांचे पोलीस उपनिरीक्षक घाडगे, आक्रम मेटकरी, पांडव, निकम, अमोल पवार, कांबळे उपस्थित होते.

loading image
go to top