Jayaprabha Studio : जयप्रभा स्टुडिओ आता महापालिकेकडे जाणार

राजेश क्षीरसागर; राज्य शासनाचे निर्देश
Jayaprabha Studio
Jayaprabha Studiosakal

कोल्हापूर - चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार ‘जयप्रभा स्टुडिओ’च्या जागेचा प्रश्न गेली वर्षभर प्रलंबित होता. स्टुडिओच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून, ही जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार तत्काळ पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

श्री. क्षीरसागर म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाने तीन ऑगस्ट २०२३ रोजीच्या पत्रान्वये महापालिकेला निर्देश दिले आहेत. या जागेबाबत निर्णय घेण्याचे दोन पर्याय शासनाने दिले आहेत. महापालिकेने जयप्रभा स्टुडिओच्या जागेच्या

Jayaprabha Studio
Ambabai Mandir Kolapur : आजच्या नव्या रुपातल्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं घरबसल्या घ्या दर्शन

मोबदल्यात श्री महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी फर्मला पर्यायी जागा परस्पर सहमतीने उपलब्ध करून देऊन सदर जागा ताब्यात घ्यावी. ते शक्य नसल्यास हेरिटेज जागेच्या संपादनाच्या मोबदल्यात उर्वरित जागेत जमीन मालकास बांधकामास परवानगी देऊन विकास हस्तांतरणीय हक्क (टीडीआर) उपलब्ध करून देण्यात यावा.’’

ते म्हणाले, ‘‘स्टुडिओच्या जागेचा प्रश्न निकाली लागण्याच्या स्थितीत असताना या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न काही कॉंग्रेसच्या नेत्यांकडून झाला. भारतरत्न लता मंगेशकर आणि महालक्ष्मी एल.एल.पी. फर्ममध्ये कायदेशीर व्यवहार झाला आहे.

भारतीय कायद्यानुसार १८ वर्षे पूर्ण झालेल्या सज्ञान व्यक्तीला जागा खरेदी-विक्री करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. अशी सत्यपरिस्थिती असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनामी करण्याच्या हेतूनेच जनता आणि कलाकारांमध्ये गैरसमज पसरविण्याचा डाव आखला गेला. जनभावनांचा अनादर होणार नाही, याची नेहमीच दक्षता आजवर घेतली. स्टुडिओसाठी यापुढेही चित्रीकरणासाठी व कलाकारांसाठी आवश्यक बाबी पुरवून स्टुडिओचा विकास करण्यास प्रयत्नशील आहे.’’

‘त्या’ नेत्यांनी माहिती जाहीर करावी!

जिल्ह्यातील इतर काही नेत्यांनीही शासनाच्या, देवस्थान समितीच्या हजारो एकर जागा नाममात्र भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. शहरातील अनेक मालमत्तांचा घरफाळा आणि इतर करही भरले नसल्याची माहिती पुढे आली आहे. या नेत्यांनीही याबाबतची माहिती जाहीर करावी, असेही श्री. क्षीरसागर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com