जोतिबा डोंगरावर ई पास बंद; पूर्ण गावचा मंदिरासमोर ठिय्या

मंदिरातील चारी दरवाजे खुले करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण गाव एकवटले
जोतिबा डोंगर
जोतिबा डोंगरSakal

जोतिबा डोंगर : श्रीक्षेत्र जोतिबा मंदिरातील चारी दरवाजे खुले करा तसेच ई पास दर्शन पद्धत सेवा बंद या मागणीसाठी आज सर्व जोतिबा ग्रामस्थांनी मंदिरासमोर सकाळी नऊ वाजल्यापासून ठिय्या मांडला आहे. त्यामुळे संपूर्ण गाव एकवटले आहे. आज या निमित्ताने पूर्ण गाव बंद ठेवून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. जिल्हात कोरोनाचे प्रमाण सध्या अल्प प्रमाणात आहे .परिणामी डोंगरावर मात्र सर्व जाचक नियम अटी लागू आहेत. नवरात्र उत्सवापासून मंदिरात ई पास दर्शन पध्दत आहे. मंदिरातील एकच दरवाजा खुला आहे.

एकाच दरवाजाने भाविकांना ये-जा करावी लागते. त्यामुळे चेंगराचेंगरी सारखे प्रकार घडतात. त्यामुळे लहान महिला व वयोवृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रविवारी तर ८ ते ९ या वेळेत हा ही दरवाजा बंद केला जातो. भाविकांना ताटकळत तासभर दरवाजात उभे राहावे लागते. या बाबत प्रशासनास वारंवार कळविले आहे पण काही अमलबंजावनी झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थ पुजारी संतप्त झाले आहेत.

जोतिबा डोंगर
बेळगाव : मराठीबाबत दुजाभाव करणाऱ्या प्रशासनाला इंग्रजीचेही वावडे

त्यामुळे तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी राहुल रेखावार ,प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, शाहुवाडीचे पोलीस उपअधिक्षकर रवींद्र साळुंखे यांना निवेदन देऊन मंदिर परिसरात आंदोलन करणार असल्याचे कळविले होते. त्यानुसार आज सकाळी नऊ वाजता या आंदोलनास प्रारंभ झाला. संपूर्ण गाव झाडून मंदिर परिसरातील दरवाज्यावर ठाण मांडून बसले होते. या आंदोलनास खासदार छत्रपती संभाजीराजे खासदार धैयशील माने, मानाची सासन काठी असणाऱ्या सर्व गावांनी पाठिंबा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com