कोल्हापूर जिल्ह्यात गव्यांचा धुडगूस; जोतिबा डोंगरावरही कळप, हातातोंडाशी आलेलं पीक केलं उद्‌ध्वस्त

गव्यांचा मुक्काम गेले दोन दिवस गिरोली (ता. पन्हाळा) येथे होता. तेथे त्यांनी शाळू पिकाचा फडशा पाडला आहे.
Jyotiba Dongar Bison
Jyotiba Dongar Bisonesakal
Summary

हातातोंडाशी आलेले पीक उद्‌ध्वस्त झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

जोतिबा डोंगर : येथील कोल्हापूर जोतिबा (Jyotiba Dongar Kolhapur) मार्गावरील चव्हाण तळे परिसरात काल सकाळी गव्याच्या कळपाचे दर्शन झाले. हा कळप रस्त्यावर आला तेव्हा बघ्यांची मोठी गर्दी जमली. वन अधिकाऱ्यांनी धाव घेऊन या गर्दीला हटविले व रेस्क्यू पथकाने गव्यांना जंगलाकडे हाकलून लावले.

जोतिबा मार्गावरील चव्हाण तळे परिसरात गव्याचा कळप रस्त्यावर आला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमल्याचा दूरध्वनी पन्हाळ्याचे वनपाल सागर पटकारे यांना आला. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन गर्दीला हटविले व रेस्क्यू टीमला पाचारण केले. या पथकाने ड्रोनच्या साहाय्याने जंगलाच्या दिशेने हाकलून लावले. या मोहिमेत पन्हाळ्याचे वनक्षेत्रपाल अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पटकारे, वनरक्षक (Forest Department) अमर माने, रेस्क्यू पथकप्रमुख प्रदीप सुतार यांनी काम पाहिले.

Jyotiba Dongar Bison
Diabetes Symptoms : सावधान..! लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेह; वेळीच दक्षता न घेतल्यास आयुष्यभर राहणार धोका

दरम्यान, या गव्यांचा मुक्काम गेले दोन दिवस गिरोली (ता. पन्हाळा) येथे होता. तेथे त्यांनी शाळू पिकाचा फडशा पाडला आहे. शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे . शेतकरी वर्ग मचान उभे करून पिकांची राखण करतात, पण दोन दिवस झाले मोठा कळप असल्याने भयभित होऊन राखण केली नाही. हातातोंडाशी आलेले पीक उद्‌ध्वस्त झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com