Kolhapur Crime : 'तुम्ही गर्भलिंग निदान करून महिना दहा लाख मिळवता'; बनावट ACB अधिकाऱ्यांकडून डॉक्टरचं अपहरण, पोलिसांनी 'असा' लावला छडा

'तुम्ही गर्भलिंग निदान करून महिना दहा लाख रुपये मिळवता म्हणून तुमच्याविरोधात तक्रार आहे.'
Anti Corruption Bureau Officers
Anti Corruption Bureau Officersesakal
Summary

वकिलांनी त्या अधिकाऱ्यांकडे अधिक चौकशी करून ओळखपत्राची मागणी केली; तेव्हा त्यांनी दाखविलेले ओळखपत्र शासकीय नसल्याचे दिसून आले.

Kolhapur News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti Corruption Bureau) अधिकारी असल्याचा बनाव करून कणेरी (जि. रत्नागिरी) येथील डॉक्टरचे अपहरण करून दहा लाखांची मागणी केल्याप्रकरणी येथील तिघांना अटक करण्यात आली आहे.

सुमित विष्णू घोडके (वय ३३, रा. घ. नं. ६६५८, प्रगतीनगर, पाचगाव, ता. करवीर), रवींद्र आबासाहेब पाटील (४२, पाटाकडील गल्ली, वाशी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) आणि सुयोग सुरेश कार्वेकर (३८, प्लॉट क्रमांक १० सावकर गल्ली, इंद्रायणीनगरजवळ मोरेवाडी, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.

Anti Corruption Bureau Officers
Shambhuraj Desai : 'मराठा समाजानं शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेऊ नये'; उदनराजेंच्या भेटीदरम्यान मंत्री देसाईंचं आवाहन

येथील पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ मुख्य प्रशासकीय इमारत पार्किंगमध्ये ही कारवाई झाली. शाहूपुरी पोलिसांनी (Shahupuri Police) ही कारवाई करून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी सांगितले, की डॉ. सुभाष आण्‍णाप्पा डाक (मु. पो. कणेरी. ता. राजापूर) हे त्यांच्या गावी क्लिनिक चालवतात. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या क्लिनिकमध्ये तिघेजण पोचले. त्यांनी रवींद्र दिल्लीतील तर सुमित आणि सुयोग दोघे कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून आल्‍याचे सांगितले. डॉक्टरांकडे त्यांचा क्लिनिकचा परवाना, इतर कागदपत्रे पाहण्यासाठी मागितली.

Anti Corruption Bureau Officers
Kolhapur Bandh : मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर आज बंद; सर्व शाळांना सुटी जाहीर

याचवेळी ‘कोल्हापुरातील व्यक्तीने तुमच्याविरोधात तक्रार दिली आहे. तुम्हाला पोलिस ठाण्यात यावे लागेल’ असे सांगितले. तेथून ते डॉक्टरांना मोटारीतून घेऊन पुढे राजापूर पोलिस ठाण्याच्याही पुढे आले, तेव्हा त्यांनी ‘पोलिस ठाणे मागे गेले, मला कोठे घेऊन जात आहात’ अशी विचारणा केली. तेव्हा कोल्हापुरातून तक्रार आहे, कोल्हापुरात पोलिस ठाण्यात घेऊन जात असल्याचे सांगितले.

साधारण दुपारी तीनच्या सुमारास भुईबावडा घाटातून पुढे गगनबावडा येथे पोचले. तेथे चौघांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले. यावेळी ‘तुम्ही गर्भलिंग निदान करून महिना दहा लाख रुपये मिळवता म्हणून तुमच्याविरोधात तक्रार आहे. त्यामुळे तुमच्यावर खटला दाखल करणार आहोत. काही मॅनेज करा, आम्हाला दहा लाख रुपये द्या, आम्ही तुमच्यावर खटला दाखल करीत नाही. तुम्हाला सोडून देतो,’ असे सांगितले.

Anti Corruption Bureau Officers
Jalna Maratha Andolan : लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात कडकडीत बंद; एसटीच्या तब्बल 634 फेऱ्या रद्द, मतदानावर बहिष्काराचा इशारा

यावर डॉक्टरांनी पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर चौघे जेवण करीत असताना डॉ. डाक यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सकाळी गडबडीत बाहेर पडताना डॉ. डाक यांच्याकडे त्यांच्या पत्नीचा मोबाईल हॅण्डसेट खिशात होता. त्यावरून गगनबावडा येथून डॉक्टरांनी पत्नीशी संपर्क साधून याची माहिती दिली. कोल्हापूरला जात असल्याचे सांगितले.

Anti Corruption Bureau Officers
Hasan Mushrif : मराठा आरक्षण रद्द होण्यामागची खरी कारणं लोकांना माहिती आहेत; हसन मुश्रीफांचा कोणावर निशाणा?

यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास फुलेवाडी नाक्याजवळ आल्यावर मामेभावालाही माहिती दिली. मामेभाऊ मेहुण्यांना घेऊन तेथे आला. त्यांनी एफआयआर आहे काय, अटक वॉरंट आहे काय, अशी विचारणा केली. यावर पोलिस अधीक्षक कार्यालयात चाललो आहे, तेथे या तुम्हाला सर्व माहिती देतो, असे तोतया अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

सायंकाळी सातच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयाशेजारील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये मोटार उभी केली. यावेळी तेथे मेहुणे, मामेभाऊ हे ओळखीच्या दोन वकिलांनाही घेऊन तेथे आले. वकिलांनी त्या अधिकाऱ्यांकडे अधिक चौकशी करून ओळखपत्राची मागणी केली; तेव्हा त्यांनी दाखविलेले ओळखपत्र शासकीय नसल्याचे दिसून आले. त्यावेळी तेथे असलेले अधिकारी बनावट असल्याचे फिर्यादी डॉक्टरांच्या लक्षात आले.

Anti Corruption Bureau Officers
Jalna Maratha Andolan : बार असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! मराठा आंदोलकांवरील खटले लढणार विनामोबदला, आंदोलनालाही दिला पाठिंबा

फिर्यादी डॉक्टरांना संबंधित अधिकारी बनावट असल्याची खात्री मुख्य प्रशासकीय इमारत परिसरात झाली. तेथूनच त्यांनी पोलिस मदतीसाठी असलेल्या ११२ क्रमांकावर संपर्क साधला. थोड्याच वेळात शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्यासह पोलिसांचे पथक तेथे आले. त्यांनी तिघांना ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित आणि उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्र्वेता पाटील, सहायक फौजदार संदीप जाधव, बाबा ढाकणे, रवी आंबेकर, शुभम संकपाळ, लखन पाटील, संदीप बोंद्रे, कार्वेकर, सुर्वे आदींनी कारवाई केली.

Anti Corruption Bureau Officers
Ramdas Athawale : आंबेडकरांचे संविधान कोणालाही बदलू देणार नाही आणि कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर..; आठवलेंचा स्पष्ट इशारा

दिल्लीचा ‘साहेब’ बारावी नापास...

संशयित सुमित घोडके, रवींद्र पाटील आणि सुयोग कार्वेकर स्वतःला अँटीकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया कोल्हापूर (महाराष्ट्र) चे एक्झिक्युटिव्ह मेंबर असल्याचे सांगत होते. यातील रवींद्र दिल्लीचा अधिकारी असल्याचे सांगत होता. तो प्रत्यक्षात बारावी नापास आहे. रवींद्र छाप्यादरम्यान हिंदीतून बोलत होता. सुयोग बीएस्सी झाला आहे, तर सुमितचे बीकॉम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com