जयसिंगपूर : महाराष्ट्राचे मरण ठरलेल्या कर्नाटकच्या आलमट्टी धरण (Almatti Dam Karnataka) उंची वाढीला विरोध करण्यासाठी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील पूरग्रस्त लोकांचा महापूर रविवारी (ता. १८) अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलनाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. उंची वाढीला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या पुढाकाराने तीन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. धरणाच्या उंची वाढीचा निर्णय हाणून पाडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.