esakal | 'KDCC'चे रणांगण; आमदार राजेश पाटील यांच्याविरोधात कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

Election

जिल्हा बँकेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आल्यास ते काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे.

'KDCC'चे रणांगण; आमदार राजेश पाटील यांच्याविरोधात कोण?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंदगड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाने गती घेतली आहे. पात्र संस्थांचे ठराव आपल्याला गटप्रमुखांकडे दिले जात आहेत. विद्यमान संचालक आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांच्याविरोधात तालुक्यात गोपाळराव पाटील व भरमूअण्णा पाटील, शिवाजीराव पाटील यांची भूमिका काय राहणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

तत्कालीन आमदार (कै.) व्ही. के. चव्हाण-पाटील यांच्यानंतर सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ माजी आमदार नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांनी बँकेवर प्रतिनिधित्व केले. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आमदार राजेश पाटील यांना संधी मिळाली. या निवडणुकीतही त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र, त्यांच्याविरोधात कोण याची उत्सुकता आहे. तालुक्यात ४५५ पात्र संस्थांचे मतदान आहे. सेवा संस्था गटावर आमदार पाटील गटाचे वर्चस्व आहे; तर दूध व इतर संस्थांवर संमिश्र चित्र आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत भरमूअण्णा गटाने विरोधी भूमिका निभावली. मात्र, नरसिंगराव यांच्याविरोधात ताकदीचा उमेदवार देता आला नाही.

हेही वाचा: महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण : छगन भुजबळांसह 6 जण दोषमुक्त

गत निवडणुकीत भरमूअण्णा गटाने गोपाळराव यांना पाठिंबा दिला होता. मात्र, त्या वेळी अटीतटीच्या लढाईत नरसिंगराव पाटील यांनी बाजी मारली होती. पाच वर्षांत राजकीय समीकरणे बदलली आहेत. भरमूअण्णा व गोपाळराव भाजप म्हणून एकत्र होते. मात्र, गोपाळराव यांनी नुकतीच फारकत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा बँकेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आल्यास ते काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे. जिल्हा पातळीवर भाजप काय निर्णय घेणार? त्यानुसार भरमूअण्णा व शिवाजीराव पाटील यांची व्यूहरचना ठरेल.

दृष्टिक्षेपात चंदगड तालुका

  • विद्यमान संचालक- आमदार राजेश पाटील

  • पात्र संस्था- ४५५

  • विकास सेवा संस्था- १२९

  • खरेदी-विक्री संस्था- ३२

  • नागरी बँक व पतसंस्था- ६३

  • दूध व इतर संस्था- २३१

हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर निर्दोष जाहीर

loading image
go to top