

Kolhapur Crime News
esakal
Dead Body Found in Well Kolhapur : शिये येथील चिकन विक्रेत्याचा पुलाची शिरोली येथील विहिरीत मृतदेह मिळाला. फिरोज खानसो मुजावर (वय ४३, रा. हनुमाननगर) असे त्यांचे नाव आहे. आर्थिक वादातून जवळच्या व्यक्तीनेच घातपात केल्याचा संशय त्यांचा मुलगा फरान याने व्यक्त केला आहे. मृतदेहाच्या तोंडात कापडी बोळा, डोक्यात आणि पाठीवर जखमा आहेत. त्यामुळे हा घातपात असल्याचे अंदाज बांधत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.