

Kolhapur Circuit Bench
esakal
Supreme Court Verdict : कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान यावर आज १८ डिसेंबरला झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायायलयाने ही याचिका फेटाळली आहे. अॅड. रणजित बाबुराव निंबाळकर यांनी १ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या अधिसूचनेला आव्हान देत ही याचिका दाखल केली होती. ही अधिसूचना राज्य पुनर्रचना अधिनियम, १९५६ च्या कलम ५१(३) अंतर्गत जारी करण्यात आली असून, १८ ऑगस्टपासून कोल्हापूर सर्किट बेंच कार्यान्वित झाली आहे.