

कोल्हापूर महानगरपालिकेतील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची केल्याप्रकरणी चार अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
esakal
Kolhapur Commissioner : कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार न केल्याने उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर व निवास पोवार यांची एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात रोखण्याचे आदेश प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले. या चौघांना गेल्या महिन्यात कारवाई का करू नये, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली होती.