LPG Price : गॅस दरवाढ आणि तुटवड्यामुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चावर मोठा परिणाम होत असल्यामुळे, कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून महिलांनी पिठलं-भाकरी बनवत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कोल्हापूर : गॅस दरवाढ आणि आखाती युद्धामुळे निर्माण झालेला गॅसचा तुटवडा याचा काँग्रेसने आज निषेध केला. कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून निदर्शने केली. महिलांनी चुलीवर पिठले-भाकरी बनवली.