
असे येईल पाणी
शिंगणापूर योजनेतून ए, बी, तसेच राजारामपुरी भागाला
बालिंगा उपसा केंद्रातून सी, डी वॉर्डला
थेट पाईपलाईन योजनेतून कसबा बावडा, संलग्न ई वॉर्ड
Pump Repair Delayed Kolhapur : दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करूनही ई वॉर्डमधील अनेक भागांत आजही पाण्याचा तुटवडा जाणवला. त्यामुळे विविध भागांत टॅंकरच्या ७० फेऱ्या झाल्या. तंत्रज्ञ आला नसल्याने थेट पाईपलाईन योजनेच्या पंपाची दुरुस्ती झालेली नाही. कंपनीचा तंत्रज्ञ उद्या येणार असून रात्रीपर्यंत दुरुस्ती केली जाण्याची शक्यता महापालिकेने वर्तवली आहे. त्याचबरोबर आज (ता. ३०) सायंकाळी शिंगणापूर योजनाही सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रविवारी (ता. ३१) सर्व भागांत नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असेही सांगितले आहे.